Sun, Jul 21, 2019 12:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वीज नियामक आयोगाकडून वाढीव वीज बिलांची दखल

वीज नियामक आयोगाकडून वाढीव वीज बिलांची दखल

Published On: Dec 07 2018 8:26PM | Last Updated: Dec 07 2018 5:50PM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई उपनगरातील वीज पुरवठा करणाऱ्या इलेक्ट्रिकल कंपनीकडून ग्राहकांच्या वीज बिल वाढीची दखल वीज नियामक आयोगाने घेतली आहे. त्यासाठी दोन सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी केली आहे.

मुंबई उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिकल कंपनीकडून ग्राहकांना आलेल्या वीज बिल वाढीची गंभीर दखल राज्य वीज नियामक आयोगाने घेतली आहे. वीज वापरात अचानक वाढ का झाली? यासंदर्भात मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या बिलाची तपासणी करण्याचा निर्णय वीज नियामक आयोगाने घेतला आहे. 

यासाठी माहिती आयुक्त अजितकुमार जैन, एमईआरसीचे माजी सदस्य व्ही. एल. सोनवणे यांनी दोन सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी केली.