Tue, Apr 23, 2019 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत ३१ मेपासून धावणार इलेक्ट्रिक वाहने

मुंबईत ३१ मेपासून धावणार इलेक्ट्रिक वाहने

Published On: May 29 2018 2:14AM | Last Updated: May 29 2018 1:50AMमुंबई : चंदन शिरवाळे

केंद्र सरकारच्या धोरणानुसार तेलंगणा, आंध्र प्रदेश व दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही इलेक्ट्रिक वाहने धावणार आहेत. राज्य सरकारने टाटा आणि महिंद्रा उद्योग समूहांकडून ई- वाहने भाडेतत्त्वावर घेतली असून, त्यासाठी मंत्रालयात सुरू करण्यात येणार्‍या राज्यातील पहिल्या चार्जिंग स्टेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 मे रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबईनंतर पुणे व नागपूरमध्येही अशा प्रकारची वाहने धावणार आहेत.

देशात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) ही कंपनी अशा प्रकारची वाहने तयार करते.