Sun, May 19, 2019 22:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची आज निवडणूक

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची आज निवडणूक

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:31AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (सोमवारी) पार पडणार आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. साडेतीन वर्षांनंतर अस्तित्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडप्रक्रिया ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आज सोमवार 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे. 

जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडीनंतर जि.प.च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचीही निवड आठवडाभरानंतर होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी जबाबदारी पार पाडणार आहेत. या पदांसाठी उमेदवारी प्राप्त झालेल्यांपैकी पसंतीच्या उमेदवारास बोट उंच करून पसंती दर्शवण्याची पद्धत या निवडप्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. 

शिवसेनेलाही पहिल्यांदा भगवा फडकवण्याची संधी आहे. राष्ट्रवादीला आपल्या गोटात खेचण्यास शिवसेना यशस्वी झाल्यास ठाणे जिल्हा परिषदेवर इतिहास घडणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.