Mon, Jun 24, 2019 21:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई सहकार बोर्डात सेनेचा धुव्वा

मुंबई सहकार बोर्डात सेनेचा धुव्वा

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 1:08AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावलेल्या मुंबई सहकार बोर्डाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत क्रांती पॅनलचा धुव्वा उडाला. मुंबईतील सहकार नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे 21 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. मुंबई सहकार बोर्डाच्या निवडणुकीतील हा ऐतिहासीक विजय मानला जात आहे.

सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार्‍या या संस्थेवर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, आमदार सुनील राऊत, अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती पॅनल स्थापन करण्यात आले होते. निवडणूक जाहीर झाल्यापासुन मुंबईतील सहकार चळवळतील कार्यकर्त्यांशी संपर्क करुन क्रांती पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी फिल्डींग लावण्यात आली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासुन विविध राजकीय पक्षांशी संलग्न असलेल्या सहकार नेत्यांच्या हातातील मुंबई सहकार बोर्डाची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात जाईल का, अशी चर्चा होती. पण रविवारी झालेल्या मतमोजणीनंतर ती फोल ठरली. शिवसेना पुरस्कृत क्रांती पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

सहकार चळवळीतील नेत्यांनी पॅनल स्थापन करुन 21 उमेदवार मैदानात उतरविले होते. त्यामध्ये सुनील बांबुळकर, अनिल गजरे, हरिष हिंगे, श्रीधर जगताप, विजय केदारे, आनंद माईंगडे, अनिल निकम, हंबीरराव परार, स्वप्नील फाटक, 

भास्करराव राऊत, विजय शेलार, जयंत शिरीषकर, प्रकाश सोसे, विठ्ठल वाळुंज, अमोल खरात, चंद्रकांत वंजारी, किशोर पाटणकर, कृष्णा शेलार, ह्दयनाथ डोके, जयश्री पांचाळ व रेखा सोनवले यांचा समावेश होता. हे सर्वच उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले.