Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी निवडणूक

राज्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी निवडणूक

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींसाठी येत्या दि. 27 मे रेजी मतदान होणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपुर्वी आपआपल्या मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकीबरोबरच 33 जिल्ह्यांतील  2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीही  मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. 

ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. 14 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.  16 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.  दि.  27 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. 

Tags : Mumbai, Gram Panchayat, vacant seats, Election, Mumbai news,