Sun, May 26, 2019 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीडीआर प्रकरणातील आठवा आरोपी अटकेत

सीडीआर प्रकरणातील आठवा आरोपी अटकेत

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:24AMठाणे : वार्ताहर

सीडीआर प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने सात आरोपी अटक केले आहेत. मंगळवारी पथकाने आठवा आरोपी किरपेश कवी याला अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आठ झाली आहे. यापैकी रजनी पंडित या महिला डिटेक्टिव्ह यांना 17 फेब्रुवारीपर्यंत  न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर आठवा आरोपीं किरपेश कवी याला सुट्टीकालीन न्यायालयात नेले असता 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. 

बुधवारी पंडित यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून त्यांच्या वकील पूनम जाधव न्यायालयात युक्तीवाद करणार आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मंगळवारी आठवा आरोपी किरपेश कवी याला मुंबई परिसरातून अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला, कवी पोलिसांना 1992-93 साली सिनेमात डायरेक्टर म्हणून काम केल्याचे सांगत आहे. पोलिसांनी माहिती तपासली असता तसे काही आढळले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील दिल्लीतील मुख्यसूत्रधार हा अजूनही पोलीस पथकाला गुंगारा देत आहे. अटक आरोपी कवी याचा या प्रकरणात नेमका कुठला रोल आहे. हे चौकशीत स्पष्ट होईल.