Fri, Jul 10, 2020 18:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत इजिप्तचा कांदा दाखल 

मुंबईत इजिप्तचा कांदा दाखल 

Last Updated: Nov 15 2019 12:34PM
नवी मुंबई : प्रतिनिधी 

परतीच्या पावसामुळे नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील  कांद्याचे भाव प्रती किलो 60 ते 65 रूपये किलो झाल्याने गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी मुंबई एपीएमसीत पुष्पा ट्रेडिंग कंपनीकडे इजिप्तचा 3 कंटेनर कांदा एक्स्पोर्टरने पाठवला. या कांद्याचे दर 15 ते 60 रूपये किलो आहेत. हलक्या प्रतीचा माल असल्याने हा कांदा दोन दिवस टिकू शकतो. येत्या रविवारी आणखी 110 ते 120 कंटेनर मुंबई एपीएमसीत दाखल होणार असून, 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत 80 कंटेनर कांदा मागवण्यात आल आहे. 

इजिप्तच्या या कांद्याचे दर कमी असून तो फार काळ टिकणारा कांदा नसल्याने त्याची खरेदी सामान्य ग्राहक किंवा किरकोळ खरेदीदार करत नाहीत. केवळ हॉटेल व्यावसायिक तो माल खरेदी करत आहेत. इजिप्तवरून जेएनपीटी बंदरात येण्यासाठी कंटेनरला 15 दिवसांचा कालावधी लागला. काल गुरूवारी हे कंटेनर एपीएमसीत दाखल झाले. मालाला उठाव नसल्याने आजही निम्मा कांदा पडून आहे. कंटेनर मुंबईपर्यंत येताना 25 टक्के कांदा कंटेनर मध्ये सडला. अशी माहिती पुष्पा ट्रेडिंग कंपनीचे मालक संजय पारस यांनी दिली. 

महाराष्ट्रातील कांदा आणि इजिप्त कांदा यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. राज्यातील उन्हाळी कांदा सहा महिने टिकतो. तो लवकर खराब होत नाही. मुंबईत किरकोळ खरेदीदारांची त्याला मागणी आहे. मात्र माल नसल्याने आहे त्या आवकेवर सध्या बाजार सुरू आहे. नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 55 ते 60 रूपये दर आहे. रविवारपासून झजिप्तवरून आणखी 120 कंटेनर कांदा मागवण्यात आला आहे.