Tue, Jul 16, 2019 11:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंडी कडाडली

अंडी कडाडली

Published On: Jul 14 2018 1:05AM | Last Updated: Jul 14 2018 1:05AMनवी मुंबई: प्रतिनिधी

पोल्ट्री व्यवसायात लागणारे खाद्य, मालवाहतूक खर्च आणि कोंबड्यांसाठी लागणारी औषधे महागल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे. 15 जूनपासून आजपर्यंत अंड्यांचे बाजारभाव तब्बल डझनमागे किरकोळ बाजारात 27 रुपयांनी वाढले. तर दुसरीकडे अंडी खाणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाल्याने खपाचे प्रमाण तब्बल 35 लाखांनी वाढल्याने आजमितीस 85 लाख अंड्यांची विक्री होत असल्याची माहिती मुंबई एग्ज असोसिएशनचे पदधिकारी राजू शेवाळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

मुंबई, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत रोज 50 ते 60 लाख अंड्याची विक्री होत होती. ऐन पावसाळ्यात ही विक्री वाढली आणि 80 ते 85 लाखांवर पोहोचली आहे. 15 जून आधी ही विक्री या तीन जिल्ह्यांत 40 टक्के होती. आता 75 ते 80 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे महिन्याभरात 35 लाख अंड्यांचा खप वाढला आहे. शिवाय अंड्यांचे दरही डझनामागे 27 रुपयांनी वाढले. महिन्याभरापूर्वी म्हणजे 14 जूनपर्यंत 48 ते 50 रुपये डझन अंडी किरकोळ बाजारात विक्री होत होती.

त्यानंतर अंड्यांच्या दरात भाववाढ झाल्याने डझनामागे 27 रुपये वाढले आणि अंडी 75 रुपये डझन झाली. ही भाववाढ आजही कायम आहे.घाऊक बाजारात 467 रुपये शेकडा अंड्यांची विक्री केली जाते.  15 जून ते आजपर्यंत भावात कुठली ही चढउतार झाली नसल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले. ही भाववाढजीएसटी,खाद्य, इंधन आणि औषधांच्या किमतीत वाढ झाल्याचे ते म्हणाले. त्याचा परिणाम अंडी भावाढीवर झाला आहे.