होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहायक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर बेपत्‍ता 

सहायक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर बेपत्‍ता 

Published On: Apr 08 2018 1:22AM | Last Updated: Apr 08 2018 1:22AM



नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त तुषार दोषी यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त  बेपत्ता  झाल्याच्या वृत्ताला पुढारी ऑनलाईनशी बोलताना दुजोरा दिला. 

सहायक पोलिस आयुक्त  राजकुमार चाफेकर दोन दिवसापासून बेपत्ता झाल्याने चाफेकर कुटुंब बेचैन झाले आहे. दोन दिवस झाले कुटुंबाच्या संपर्कात नसल्याचे कळते. चालू आठवड्यात एससीपी चाफेकर नियमित पोलिस आयुक्तालयातील गुन्हे विभागाच्या कार्यालयात कर्तव्यावर होते. त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे विभाग देण्यात आला आहे. या आधी ते रायगड जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक पदावर माणगावला होते. त्यानंतर त्यांची बदली नवी मुंबईत झाली. एसीपी न्हावाशेवा विभागाचा पदभार सांभाळला होता. त्याचवेळी दोन दिवस त्यांना पनवेल एसीपी  सुट्टीवर गेल्याने सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाचा तपास केला होता. कंळबोली पोलिस ठाण्यात त्यांनी अभय कुरूंदकरसह इतर दोघांची चौकशी केली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या शाखा एकने सिडकोच्या भूखंड प्रकरणी बोगस कागदपत्रे तयार करून भूखंड गिंळकृत करणाऱ्या शिवसेनेच्या पदधिकाऱ्याला अटक केली होती. असं असताना अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबाने आज राजकुमार चाफेकर बेपत्ता झाल्याची तक्रार एनआरआय पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
 

Tags : Navi Mumbai, Economic Offenses,  Assistant commissioner police Rajkumar Chaphekar