Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त! 

छगन भुजबळांची 20 कोटींची मालमत्ता जप्त! 

Published On: Dec 05 2017 4:07PM | Last Updated: Dec 05 2017 4:07PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आर्थिक गैरव्यहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची 20 कोटींची मालमत्ता जप्त केली. आतापर्यंत ईडीने भुजबळांची तब्बल 178 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी छगन भुजबळ न्यायालयीन कोठडीत आहेत. अनेक वेळा जामीनासाठी अर्ज करूनही त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर या आठवड्यातच निर्णय होणार आहे. भुजबळांवर मनी लाँड्रिंग कायद्यानुसार खटला सुरु आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा पंकज आणि समीर हे सुद्धा सहआरोपी आहेत.