Fri, Sep 21, 2018 07:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळाला तडे 

कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळाला तडे 

Published On: Jul 02 2018 1:30PM | Last Updated: Jul 02 2018 1:22PMकल्याण : वार्ताहर

मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडांचे सत्र सुरुच असून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता कल्याण-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने पुन्हा अर्धा तास वाहतूक खोळंबली होती .कल्याण-ठाकुर्ली दरम्यान  मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळाला पाच मीटरच्या अंतरावर दोन तडे गेले होते. दरम्यान वाहतूक  धीम्या रुळावरून वळण्यात आली. त्यामुळे लोकल उशिराने धावत होत्या. 

रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुरुस्त केला. मध्य रेल्वेच्या मार्गावर गेल्या महिन्यापासून कधी सिग्नल यंत्रणेत कधी मालगाडीच्या इंजिनमधील बिघाड, कधी रुळालातडे यामुळे मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. या घटनांनी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला असतानाच सोमवारीदेखील कल्याण- ठाकुर्ली दरम्यान रुळाला तडे गेल्याने  रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रविवारच्या सुट्टीचा आनंद उपभोगून पुन्हा सोमवारी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा मध्य रेल्वेच्या गलथान कारभारामुले मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मार्गावर गेल्या आठवडाभरापासून तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे घटना वाढीस लागले आहेत. रेल्वे प्रशासन देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यातून एक दिवस मेगा ब्लॉक घेते मात्र त्यानंतर ही या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.