Sat, Mar 23, 2019 02:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुक्यामुळे मरेच्या लोकल १५ मिनिटे लवकर

धुक्यामुळे मरेच्या लोकल १५ मिनिटे लवकर

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 3:04AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधीं

ओखी वादळामुळे सध्या मुंबई आणि उपनगरांतील वातावरणात सकाळच्या वेळेस अधिक धुरके पाहावयास मिळत आहे. पहाटेच्या वेळेस कर्जत-कसार्‍याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लोकल सेवेवर धुक्याचा मोठा परिणाम होत असल्याने मध्य रेल्वेने 18 डिसेंबरपासून या गाड्या 10 ते 15 मिनिटे अगोदर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

हा निर्णय योग्य ठरला तरच तो कायम ठेवला जाईल. कर्जतपेक्षा टिटवाळा ते कसारा मार्गावर जरा जादाच धुके असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले. धुरक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने मोटरमनना सिग्नल दिसणे कठीण होते. त्यामुळे रेल्वेने कसारा आणि कर्जत-सीएसएमटी लोकलच्या वेळेत बदल केला आहे. कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल नेहमीच्या वेळात सुटणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.