Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुबईतील एमबीएम समूह पालटणार धारावीचे रूपडे!

दुबईतील एमबीएम समूह पालटणार धारावीचे रूपडे!

Published On: Jun 11 2018 1:34AM | Last Updated: Jun 11 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये सहकार्य करण्यास दुबईतील प्रसिद्ध एमबीएम समुहाने सहमती दाखवली आहे. डीपी वर्ल्ड समूहाने मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत आणि थुम्बे समूहाने आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांत सहयोग देण्याची तयारी दाखवली आहे. परदेश दौर्‍यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुबईत या तिन्ही उद्योग समूहांशी सकारात्मक चर्चा केली.

कॅनडा आणि अमेरिकेच्या दौर्‍यात मुख्यमंत्री फडणवीस अनेक संस्था, कंपन्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील कृषी विकास, पायाभूत सुविधा उभारणी आणि  राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार्‍या माहिती-तंत्रज्ञान आधारित उपक्रमांना गती देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याचे शिष्टमंडळ परदेश दौर्‍यावर गेले आहे.

या दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात दुबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांच्याशी  चर्चा केली. कॉर्पोरेट व्यवहार उपाध्यक्ष अनिल मेहता आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. डीपी वर्ल्डने राज्य सरकारसोबत मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत योगदान देण्याची तयारी दर्शविली. विशेषत: नागपुरात काम करण्यास हा समूह उत्सुक आहे. डीपी वर्ल्ड ही जगातील आघाडीची कंपनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीमध्ये भागिदार असलेली कंपनी आहे.