Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ड्रग्जच्या अमलाखाली कार चालवून सहा वाहनांना धडक 

ड्रग्जच्या अमलाखाली कार चालवून सहा वाहनांना धडक 

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी

ड्रग्ज सेवन करुन कार चालवून सहा वाहनांना धडक देऊन चौघांना अपघातात दुखापत केल्यानंतर संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यावसायिकाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच रविवारी सकाळी आंबोली पोलिसांनी अटक केली. हितेश कमलचंद गोलछा असे या व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

जुहू येथे राहणारा हितेश हा कमल एअर ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आहे. त्याला ड्रग्जचे व्यसन होते, तो पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेल्याने त्याला त्याच्या पालकांनी उपचारासाठी युकेला पाठविले होते. सहा महिने उपचार घेतल्यानंतर तो 20 जुलैला युकेतून मुंबईत परतला होता. सोमवारी 23 जुलैला तो फिटनेस सेंटरमध्ये त्याच्या  कारने जात होता. त्याची कार रात्री सव्वाआठ वाजता एसव्हीपी रोड, म्हाडाजवळील हनुमान मंदिरासमोर येताच त्याचे कारवरील ताबा सुटला आणि त्याने तिथे असलेल्या सहा वाहनांना जोरात धडक दिली होती. ही धडक इतकी जोरात होती की सहाही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर कारच्या धडकेने चारजण जखमी झाले होते.