Tue, Jan 22, 2019 07:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्‍ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन

ज्येष्‍ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन

Published On: May 21 2018 11:11PM | Last Updated: May 21 2018 11:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

ज्येष्‍ठ रंगकर्मी, शास्‍त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्‍नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील स्‍मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्‍कार करण्यात येणार आहेत. 

डॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रातील एक लक्षणीय नाव होते. व्यवसायाने शास्‍त्रज्ञ असलेल्या डॉ. अधिकारी यांनी लोकविज्ञान चळवळ, अण्‍वस्‍त्र विरोधी शांतता चळवळीत काम केले. त्यांच्या रंगकर्मी सिनेअभिनेते या ओळखीबरोबरच आपल्या विवेकशील दृष्‍टीकोनासाठीही त्यांना ओळखले जायचे.

डॉ. अधिकारी यांनी ४५ नाटकं, १६ मराठी व हिंदी चित्रपट आणि ७ मालिकांमध्ये काम केले.

Tags : mumbai, Dr hemu adhikari, cinema, film, bollywood