Tue, Jul 23, 2019 11:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. श्रीनिवास वरखेडी ‘कालिदास’चे कुलगुरू

डॉ. श्रीनिवास वरखेडी ‘कालिदास’चे कुलगुरू

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 2:29AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली आहे. 

डॉ. वरखेडी सध्या बेेंगळुुरू येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठामध्ये प्राध्यापक तथा डीन पदावर कार्यरत आहेत. बंगलोर विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. ही पदवी प्राप्त केली असून दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थान येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. कुलगुरू म्हणून त्यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या यापूर्वीच्या कुलगुरू डॉ .उमा वैद्य यांचा कार्यकाळ दिनांक 18 सप्टेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार  डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ वरखेडी यांच्या नावाची घोषणा केली.