Thu, Apr 25, 2019 03:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संयुक्त राष्ट्रांतही यंदा आंबेडकर जयंती : मुख्यमंत्री

संयुक्त राष्ट्रांतही यंदा आंबेडकर जयंती : मुख्यमंत्री

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रसंघात साजरी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्र संघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनीही त्या ठिकाणी डॉ. आंबेडकर जयंती साजरी होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघात साजऱ्या होणाऱ्या आंबेडकर जयंतीबाबत काही लोक अपप्रचार व चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरवत असून त्याकडे लक्ष देऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भाजपाचे भाई गिरकर यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच डॉ. आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रांमध्ये साजरी होणार असल्याने देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यंदा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. कोल्हापुरात भीमवंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आकर्षक चित्ररथ तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  दिली होती. 

संबंधित बातमी 
डॉ. आंबेडकर जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार : ना.पाटील

Tags : Dr.Babasaheb Ambedkar, Birth Annivercery, celebrate,United Nations,CM, Devendra Fadanvis, Maharashtra Government 


  •