Tue, Jan 22, 2019 01:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ..म्हणून साहित्य संमेलनाला पंतप्रधानांना आमंत्रित करू नका

साहित्य संमेलनाला पंतप्रधानांना आमंत्रण नको!

Published On: Dec 23 2017 11:36AM | Last Updated: Dec 23 2017 12:01PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

बडोदा येथे होणार्‍या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करू नका, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश घुमटकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांना पाठवलेल्या पत्रात केले आहे.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना अनेक साहित्यिकांवर हल्ले झाले आहेत, अजूनही होत आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये विकृत इतिहास लिहिला जात आहे, राम मंदिर, घर वापसी, लव्ह जिहाद, वंदे मातरम, गोशाळा अशा घटनांवर मोदी मौन बाळगून आहेत. मराठीवरील त्यांचे प्रेम कुठेही दिसून आले नाही, त्यामुळे बडोदा येथे होणार्‍या संमेलनाला पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करू नये, असे घुमटकर म्हणतात.