होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉन दाऊद इक्बालवर नाराज

डॉन दाऊद इक्बालवर नाराज

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 1:54AMठाणे : प्रतिनिधी

दाऊदचा मुलगा मोईन नवाज कासकर आपल्या वडिलांच्या काळ्या व्यवसायापासून दूर राहून धार्मिकतेकडे वळला आहे. त्याला आपल्या वडिलांच्या बेकायदेशीर साम्राज्यात अजिबात रस नसून तो मौलवी बनल्याची माहिती दाऊदचा अटकेत असलेला भाऊ इक्बाल कासकर याने पोलिसांना दिली होती. त्यामुळे दाऊद आपला भाऊ इक्बालवर प्रचंड नाराज असल्याचे उघड झाले आहे. तसा निरोपच दाऊदने इक्बालला त्याचाच मुलगा रिझवान कासकर मार्फत ठाणे तुरुंगात पाठवला आहे. 

मागील महिन्यात इक्बालची त्याचा मुलगा रिझवान आणि अनिस इब्राहिमचा मुलगा आरिश यांनी भेट घेतली होती. यावेळी दोघांनी दाऊदचा निरोप त्यास पोहचवल्याचे वृत्त आहे. ठाण्यातील बिल्डरांकडून खंडणी उकळल्या प्रकरणी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर सध्या ठाणे तुरुंगात आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने केलेल्या चौकशीत इक्बाल याने अनेक खळबळजनक खुलासे केले होते.  आमचा आणखी एक भाऊ वृध्दावस्थामुळे आजारी आहे. तर काही भावांचा मृत्यू झाला आहे. दाऊदला आता जवळचे नातेवाईक कोणीही नसून, दाऊदच्या या काळ्या धंद्यांचा वारसदार कोण असणार असा सवाल उपस्थित होत असून दाऊदच्या मुलाने मागील काही वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसमवेत नातेसंबंध तोडले आहेत अशी माहिती इक्बाल याने पोलिसांना दिली होती. 

दाऊदचा तीस वर्षीय मुलगा मोईनला आपल्या बापाच्या काळ्या साम्राज्यात थोडेही रस नसून तो सध्या मौलवी म्हणून ओळखला जात आहे. कराचीमध्ये एका पॉश वस्तीमध्ये असलेल्या बंगाल्यातूनही मोईन बाहेर पडला असून तो आता एका मस्जीदीमध्ये राहण्यासाठी गेला आहे. मोईन पाकिस्तानात धर्माचे पाठ तरुणांना देत असतो. तर मोईनबरोबर त्याची पत्नी आणि त्यांची लहान तीन मुलेही मस्जीदीकडून देण्यात आलेल्या एका छोट्याशा खोलीमध्ये रहात असतात अशी माहिती इक्बालने पोलीस चौकशी दरम्यान उघड केली होती. 

इक्बालचा दुबईत राहणारा मुलगा रिझवान आणि अनिस इब्राहिमचा मुलगा आरिश यांनी नुकतीच इक्बालची ठाण्यात भेट घेतली. यावेळी दोघांनी इक्बाल यास दाऊदचा निरोप दिल्याचे कळते. आपल्या कुटुंबियासंबंधितची माहिती तपास यंत्रणांना देवू नये असा निरोप दाऊदने दोघांमार्फत पाठवले होते. या भेटीवेळी आपल्या वडिलांना पाहून रिझवान यास रडू कोसळले. 

रिझवान याच्याकडे भारतीय पासपोर्ट असून तो सध्या दुबईत संगणकाचा व्यवसाय करतो. तर युएईचा पासपोर्ट आहे. दाऊदच्या या दोघा पुतन्यांवर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांच्यावर अद्याप तपास यंत्रणांची नजर नसल्याचे ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.