Tue, Nov 20, 2018 05:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉन दाऊदचा लंडनचा इन्व्हेस्टर गजाआड

डॉन दाऊदचा लंडनचा इन्व्हेस्टर गजाआड

Published On: Aug 19 2018 2:00AM | Last Updated: Aug 19 2018 1:55AMमुंबई/नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्यावतीने लंडनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करणारा आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंट सांभाळणारा जबीर मोती याला लंडन पोलिसांनी अटक केल्याने दाऊदच्या काळ्या साम्राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दाऊदचे साम्राज्य जगभरातील अनेक देशात पसरले असले तरी काहीच देशांमध्ये त्याची प्रचंड मोठी गुंतवणूक तथाा मालमत्ता एकवटलेली आहे. त्यात लंडनचा प्रामुख्याने समावेश होतो. जबीर हा लंडनशिवाय संयुक्‍त अरब अमीरात, यूरोप, आफ्रिका, पाकिस्तान आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांत गुंतवणूकीचेही व्यवस्थापन दाऊदसाठी करतो. या मोतीला जेरबंद करा अशी विनंती भारताने अलिकडेच इंग्लंडला केली होती. तस्करी, खंडणी आणि गुन्हेगारी कारवायांमध्येही मोतीचा हात आहे. मोती हा पाकिस्तानी असून तो दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन यांचा अत्यंत विश्‍वासू मानला जातो. मोतीकडे लंडनचा दहा वर्षांचा व्हिसा आहे. मात्र तो हंगेरीचे कायम नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तसेच अ‍ॅटिग्वा आणि डॉमनिकन रिपब्लिक या देशांचे दुहेरी नागरिकत्व तो मिळवणार होता.