Wed, Mar 20, 2019 12:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कराचीत बसून दाऊद सांभाळतोय काळे साम्राज्य

कराचीत बसून दाऊद सांभाळतोय काळे साम्राज्य

Published On: Apr 11 2018 9:02AM | Last Updated: Apr 11 2018 9:02AMमुंबई : वृत्तसंस्था

भारताचा सर्वात मोठा शत्रू मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम भारत सोडून पळून तर गेला; मात्र जगातील वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे काळे साम्राज्य सुरू आहे.

दाऊदने रिमोट कंट्रोलप्रमाणे पाकिस्तानच्या कराचीमध्ये बसून भारतातील काळे धंदे सुरू ठेवले आहेत. दाऊद इब्राहिम कराचीच्या उच्चभ्रू पॉश क्‍लिफ्टन परिसरातील आपल्या सेफ हाऊसमध्ये सुरक्षित असतो. सार्वजनिकरीत्या तो कधी समोर येत नाही; पण पहिल्यांदाच परदेशातील आपल्या व्यवसायाबाबत चर्चा करतानाचा त्याचा फोन कॉल समोर आला आहे. 2014 मधील हा फोन कॉल आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले. यानुसार, 80 च्या दशकात भारतातून पळालेल्या दाऊदने आता जगभरात आपले मोठे साम्राज् य उभे केल्याचे या कॉलवरून स्पष्ट होतेय. जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दाऊद त्याच्या डी कंपनीचा विस्तार करत आहे.

कराचीमध्ये बसून तो रिमोट कंट्रोल प्रमाणे दुबईतल्या अल हमरिया पोर्टच्या इमारतीतून इंटरनॅशनल क्रिमिनल नेटवर्क चालवतो. दाऊदकडे एकूण 6.7 अब्ज डॉलर संपत्ती असण्याचा अंदाज वर्तवला जातोय. दाऊद दुबईतील रियल इस्टेट व्यवसायाबाबत फोन कॉलवर चर्चा करतो. दुबई हे डी कंपनीच्या सर्व काळ्या साम्राज्याचे मुख्य केंद्र मानले जाते. Don, D, Dawood Ibrahim, Karachi, Pakistan,

Tags : Don, D, Dawood Ibrahim, Karachi, Pakistan, UAE