Mon, Apr 22, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली महिलेची निर्घृण हत्या

डोंबिवली महिलेची निर्घृण हत्या

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:14AMडोंबिवली : वार्ताहर

पश्चिम डोंबिवलीतील कोपरगावात असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मनीषा जयवंत खानोलकर (वय  60 ते 65 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून विष्णूनगर पोलिसांनी रोहित तायडे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

ओम परशुराम अपार्टमेंट मधील फ्लॅट बी,103 येथे ही महिला 17 ते 18 वर्षांपासून एकटीच राहत होती. रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास या महिलेचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. 

शाळेतील मुलांच्या शिकवण्या घेणार्‍या या महिलेची हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. यासंदर्भात फौजदार वैजनाथ केदार यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.