Sun, May 19, 2019 22:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश दोघींची सुटका

डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश दोघींची सुटका

Published On: Dec 28 2017 1:30AM | Last Updated: Dec 28 2017 12:41AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

डोंबिवलीजवळच्या काटई जकात नाका येथील साई श्रद्धा लॉजिंग अँड बोर्डिंगवर ठाण्याच्या एएचटीसी शाखेने अचानक धाड टाकून तेथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. कारवाईदरम्यान पीडित दोन तरुणींची सुटका करून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. यातील दोन फरार साथीदारांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शिळ रोडला काटई नाक्यानजीक असलेल्या साई श्रद्धा लॉजिंग अँड बोर्डिंगवर अनैतिक धंदे सुरू असल्याची माहिती ठाणे एएचटीसी शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. यानुसार सदर शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास या लॉजवर अचानक धाड टाकली. यात तेथे अव्याहतपणे चालणार्‍या अनैतिक धंद्याचा पर्दाफाश झाला. कारवाईदरम्यान दोन महिलांची मानवी तस्करांच्या तावडीतून सोडवणूक करण्यात आली. तसेच याप्रकरणी लॉज चालक तथा मॅनेजर सुकेश शेट्टी, वेटर सुरेश बन्सल, दलाल बबलू ऊर्फ राज सोराफाली गाईन, मंजुनाथ शेट्टी, सतीश शेट्टी या पाच जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर सुकेश शेट्टी, वेटर सुरेश बन्सल, दलाल बबलू उर्फ राज सोराफाली गाईन या तिघांना अटक केली. धाडीची आगाऊ खबर लागल्यामुळे मंजुनाथ शेट्टी व सतीश शेट्टी यांनी तेथून आधीच पळ काढला. पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.