Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या उपजिल्‍हाध्यक्षावर हल्‍ला (Video)

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या उपजिल्‍हाध्यक्षावर हल्‍ला (Video)

Published On: Mar 12 2018 5:55PM | Last Updated: Mar 12 2018 5:55PMडोंबिवली : वार्ताहर

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपजिल्हाअध्यक्षावर दोन अनोळखी इसमांनी घराच्या दरवाज्यात अडवून हल्ला केल्याची घटना घडली. हे हल्‍लेखोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आसून, याप्रकरणी  विष्णूनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, डोंबिवली पश्चिमेकडील, महात्मा फुले रोड येथील पाण्याच्या टाकीजवळील कुलस्वामिनी इमारतीत राहणारे समीर  पालांडे हे पहाटे आपल्‍या घरात जात असताना  दोन अज्ञात इसमांनी त्‍यांना घराबाहेर अडवून तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगत घरा बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र पालांडे यांनी मी तुम्हाला ओळखत नाही, असे सांगून त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. त्यानंतर याच अनोळखी इसमानी पालांडे यांना मारहाण करत घराबाहेर खेचण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र पालांडे हे लगेच घरात आत जाण्यात यशस्‍वी झाले. यावेळी घराबाहेरील आरडा-ओरड एकूण त्यांचे आई-वडील धावत आले. इमारतीतील रहिवाशी जागे होतील आणि आपण पकडले जाऊ, या भीतीने हल्लेखोर पळून गेले. या मारहाणीत पालांडे यांच्या पाठीला मार लागला आहे. माझे कोणाशीही वैर नसून, कुणावरही संशय नाही. हल्लेखोरांमधील एकाजवळ लोखंडी रॉड होता, असेही पालांडे यांनी सांगितले. या हल्ल्यमागे कोणाचा हात होता ? याचा तपास पोलीस करत आहे.