Sat, Mar 28, 2020 20:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग (video)

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग (video)

Last Updated: Feb 19 2020 1:17AM
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. ही आग इतकी भीषण आहे की दूरवरून या आगीचे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन दल या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

अधिक वाचा : शीना बोरा हत्या प्रकरणातील माहिती देवेन भारतींनी लपवली; राकेश मारियांचा आरोप 

मंगळवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसीच्या फेज २ येथील मे. मेट्रो पॉलिटन या कंपनीमध्ये अचानक आग लागली. घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन दलाच्या ५ बंबांसह पाण्याचे टँकर्स दाखल झाले. भडकलेली आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. सदर घटनेमध्ये अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा : 'भीमा कोरेगाव प्रकरणी समांतर चौकशी करून सत्य बाहेर आणा'

खबरदारीच्या कारणास्‍तव या कंपनीच्या जवळच्या डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील इतर कंपन्या तात्‍काळ बंद करण्यात आल्या. या कंपन्यांतील कामगारांना घरी सोडण्यात आले. जवळच्या म्हात्रे पाडा येथील रहिवासी भागही खाली करण्यात आला आहे. आसपासच्या शाळाही सोडण्यात आल्या. मिळालेल्या माहिती नुसार डोंबिवलीतील ५ अती धोकादायक असलेल्या कंपन्यांपैकी मेट्रोपॉलिटिन एक्सिम लिमिटेडही आहे. याच कंपनीत मोठी आग लागली. या धोकादायक कंपन्यांचे स्थलांतर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मध्यंतरी प्रत्यक्ष भेटीत केली होती. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. डोंबिवलीच्या सुरक्षेसाठी सदर अतिधोकादायक पाच कंपन्या ताबडतोब स्थलांतरित करणे अत्यावश्यक असल्याचे डोंबिवली वेल्फेअर सोसायटीचे सचिव राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले.