Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरोपीसमोर हात जोडणे कोणत्‍या कायद्यात? : आव्हाड (व्हिडिओ) 

आरोपीसमोर हात जोडणे कोणत्‍या कायद्यात? : आव्हाड (व्हिडिओ) 

Published On: Jan 05 2018 9:35AM | Last Updated: Jan 05 2018 12:50PM

बुकमार्क करा
पुणे: पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्‍ट्रात तणावाचे वातावरण आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्‍याचा अरोप ठेवून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर पुणे आणि औरंगाबदमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच सांगलीच्या जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी मनोहर भिडे यांच्या समोर हात जोडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगेच याचा फोटो आपल्‍या ट्विटरवर पोस्‍ट केला असून, यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. 

संभाजी भिडे यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या वतीने सांगलीच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा काढला होता. यावेळी निवेदन देण्यासाठी संभाजी भिडे यांच्यासह काही कार्यकर्ते जिल्‍हाधिकारी कार्यालयात गेल्‍यानंतर जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी भिडे यांच्यासमोर हात जोडले. 

वाचा :  बनावाची पाळेमुळे शोधा : संभाजी भिडे

हा प्रकार आव्हाड यांना समजताच त्‍यांनी आपल्‍या ट्विटरवर एक पोस्‍ट शेअर केली. यामध्ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, ‘‘भिडे यांच्यावर भीमा-कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल आहे. अशा आरोपींसमोर सांगलीचे जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक हात जोडतात. गुन्हे दाखल असलेल्‍या आरोपींसमोर पोलिसांनी हात जोडणे कोणत्‍या कायद्यात आहे? सांगलीच्या पोलिस अधिक्षकांना माहित नाही का? की भिडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते.’’

The same Bhide against whom a crime is registered for #BhimaKoregaon riot summoned the Collector and S.P of sangli in a dilapated building and they were seen standing in front of him with their hands folded .Does the law permit this?
Did the S.P not know that crme is registered? pic.twitter.com/5gxTs143j4

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2018