Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉक्‍टरांकडून महिलेच्या मृतदेहाची विटंबना

डॉक्‍टरांकडून महिलेच्या मृतदेहाची विटंबना

Published On: Apr 05 2018 9:05PM | Last Updated: Apr 05 2018 9:05PMकल्याण : वार्ताहर

कल्याण नजीक आंबिवली येथील सह्याद्री नगर परिसरात राहणाऱ्या एका बावीस वर्षीय विवाहितेला विजेचा तीव्र धक्का लागून तिचा मृत्यू झला आहे. मृत्‍यूनंतर पोलिस व रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गेल्‍या पाच तास  मृतदेहाचे पोस्ट मोर्टम करण्यात आले नाही. मृतदेहाची विटंबना होत असल्याने संतप्त झालेल्या मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी या प्रकारा बाबत हॉस्पिटलमध्ये गोंधळ केला. 

कल्याण नजीक अटाळी गावातील सह्याद्री नगरमध्ये राहणाऱ्या भावना दिनेश सावंत (वय, २२) या दोन महिन्याच्या गरोदर महिलेला गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये विजेचा जोरदार धक्का लागल्याने  तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा घरात कोणीच नसल्याने तिचे प्राण वाचवता आले नाहीत. अशी माहिती स्थानिक लोकप्रतिनिंधी दिली. या दरम्यान तिची एक वर्षाची मुलगी घरात होती ती रडायला लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घराकडे धाव घेतली असता भावना बाथरूममध्ये मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला असता रुग्णलयाने पोलिस पंचनाम्या शिवाय  पोस्ट मार्टेम करण्यास नकार दिला. ही घटना  खडकपाडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आल्याने पोलिस पंचनाम्‍या अभावी व रुक्मिणीबाई हॉस्पिटल प्रशासनाच्या कायद्याच्या तांत्रिक अडचणी मुळे मृतदेहाची विटंबना झाल्‍याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.


खडकपाडा पोलिसांनी आपल्याकडे महिला कॉन्स्टेबल नसल्याचे सांगत पंचनामा करण्यास टाळाटाळ केली तर, रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये  कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मृतदेहाचे पोस्ट मोर्टम करण्यास टाळाटाळ केल्याने तब्बल चार तास मृतदेह ताटकळत ठेवला.  मयताच्या गावी कराडला मृत देह घेऊन जायचे असल्याने रात्र होत पोलिस प्रशासन व रुग्णालय प्रशानाच्या हलगर्जी पणामुळे संतप्त नातेवाईकानी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. संध्याकाळी ७ वाजता खडकपाडा पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी डॉक्टरांणी ताब्यात घेतला. 

दरम्यान, रुग्णालयाच्या डॉकटर अश्विनी पाटील यांनी नियमानुसार पंचनामा झाल्या खेरीज शवविच्छेदन करता येत नाही. पोलिस वेळेवर पोचले असते तर तातडीने पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असता असे सांगितले .या घटनेमुळे पोलिस प्रशासनाबरोबरच पालिका प्रशासनाची अनास्था  चव्हाट्यावर आली आहे.