Thu, Nov 22, 2018 16:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशभरातील डॉक्टर आज संपावर

देशभरातील डॉक्टर आज संपावर

Published On: Jul 28 2018 2:01AM | Last Updated: Jul 28 2018 2:01AMडोंबिवली : प्रतिनिधी

केंद्र सरकार नवीन नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे. या भूमिकेविरोधात शनिवारी देशभरातील सर्व डॉक्टर संपावर जाणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पाटे यांनी दिली. हे विधेयक गरिबांच्या विरोधी असल्याने संसदेने मंजूर केल्यास सर्वसामान्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न देखील केवळ स्वप्नच राहील, अशा तरतुदी आहेत.

आज खासगी वैद्यकीय शिक्षणाची फी प्रचंड आहे. त्यातच 15 टक्के जागा मॅनेजमेंटच्या ताब्यात असल्याने भरमसाठ डोनेशन आणि फी द्यावी लागते. नवीन बिलानुसार मॅनेजमेंटला तब्बल 50 टक्के जागा दिल्या आहेत. यावरून वैद्यकीय शिक्षणाची सोय फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठी सरकार करीत आहे. एमबीबीएसची अंतिम परीक्षा केंद्रीय पातळीवर घेतल्यास ग्रामीण भागातील मुलांवर हा अन्याय होईल. अशा परीक्षांचे क्लासेस फक्त शहरी भागात आहेत, असे डॉ. अर्चना पाटे यांनी म्हटले आहे.