Mon, Jan 21, 2019 05:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

डोंबिवलीत डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:07AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

सोसायटी मेंटेनेन्स थकबाकी वसुलीच्या वादातून पाच-सहा जणांनी मिळून एका डॉक्टरवर क्रिकेट स्टंप व लाकडी दांडक्याने हल्ला चढवल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. या हल्ल्यात डॉक्टर थोडक्यात बचावले, मात्र जीवावर आले होते ते हाता-पायावर निभावले. पोलिसांनी याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 डोंबिवली पूर्वेकडे रामनगर परिसरातील समर्थ पॅलेस इमारतीमध्ये डॉ. प्रकाश देशमुख हे आपल्या कुटुंबासह राहतात. या इमारतीमध्ये राहणारे काही जण सोसायटीच्या थकबाकीचे पैसे भरत नाहीत. परिणामी सोसायटीच्या सदस्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. हा वाद शनिवारी दुपारी उफाळून आला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डॉ. देशमुख हे दुचाकीने घरी आले. दुचाकी इमारतीच्या आवारात पार्क करत असताना वरून कुणीतरी डॉक्टर आला रे आला असे ओरडले. 

डॉ. देशमुख यांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सात ते आठ जण खाली उतरले. या टोळक्याने लाकडी दांडक्याच्या सहाय्याने डॉ. देशमुख यांना झोडपून काढले. हल्लेखोरांच्या तावडीतून त्यांनी कशीबशी सुटका करवून घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यात डॉ. देशमुख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. दोन्ही हात, एक पाय आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.