Tue, Jul 16, 2019 01:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायनमधील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

सायनमधील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:14AM

बुकमार्क करा

धारावी : वार्ताहर

सायन पूर्वेतील  आयुर्वेद महाविद्यालय, शीव व शेठ र.व.आयुर्वेदिक रुग्णालयात शिकणार्‍या डॉ. विद्या विठ्ठलराव करोडकर (24) या तरुणीने रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय आवासात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. तिच्या खोलीत सुसाईड नोट सापडली आहे.

मंगळवारी सकाळी रुग्णालयातील एका डॉ. मैत्रिणीने तिला चहासाठी फोन केला असता तिने फोन उचलला नाही. विद्याच्या रुमचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहून तिने बाहेरून आवाज दिला. तिने खिडकीतून आत डोकावले असता गळफास लावलेल्या अवस्थेत तिला विद्या दिसली.

सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड, पोलीस उपनिरीक्षक मुळीक  यांच्यासह घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. सुसाईड नोट मराठीत लिहिली असून सायन पोलीस तिच्या हस्ताक्षराची तपासणी करीत आहेत. सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, याचा खुलासा अद्याप पोलिसांनी केलेला नाही. याबाबत विद्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.