Thu, Jun 27, 2019 16:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह कुठल्याच उत्सवावर खर्च करू नका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह कुठल्याच उत्सवावर खर्च करू नका

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:47AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह राज्यात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सव, रमजान ईद, दहिहंडी उत्सवांसाठी पालिकेने स्वत:च्या तिजोरीतून पैसा खर्च करू नका, असा आदेशच राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने काढला आहे. त्यामुळे उत्सवांवर होणारा करोडो रुपयाचा खर्च मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांना थांबवावा लागणार आहे. याला शिवसेनेने विरोध केला असून अप्रत्यक्षरित्या उत्सवांवर येणारी बंदी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या तिजोरीतून उत्सव साजरा करण्यावरून मिरा-भाईंदर महापालिका विरोधात प्रदीप जंगम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावणी दिली होती. या सुनावणीत उच्च न्यायालयाने 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे व अन्य राष्ट्रीय कार्यक्रमाला महापालिका आपला निधी वापरू शकते. पण गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमझान ईद, बकरी ईद, कार्तिक पौर्णिमा, छट पूजा, गुढीपाडवा, फातिमा माता उत्सव, गुरूनानक जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती व अन्य नेत्यांच्या जयंती व अन्य कार्यक्रम व उत्सवांना पालिकेला खर्च करता येणार नाही, असा निर्णय दिला होता. 

या आदेशात 25 हजार रुपयापर्यंत खर्च करण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत साजरा होणार्‍या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन, गणेशोत्सव, दहिहंडी यासाठी पालिकेतर्फे खर्च करण्यात येणार्‍या लाखो रुपयावर बंधन येणार आहे.