होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा व बहुजन समाजात फुटीचा डाव यशस्वी होऊ देऊ नका : शरद पवार 

मराठा व बहुजन समाजात फुटीचा डाव यशस्वी होऊ देऊ नका : शरद पवार 

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:41AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबा व सदिच्छा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, या आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव राज्यकर्ते खेळत असून, तो यशस्वी होऊ देऊ नका. मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनामुळे या समाजाच्या तीव्र भावना देशासमोर आल्या आहेत. या मागणीच्या पूर्ततेसंदर्भात काही वैधानिक प्रक्रियेची आवश्यकता आहे. यासाठी उचित वेळ आवश्यक आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात लागणारा वेळ, राज्य शासन आणि विधिमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी शांतता हवी आहे. राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोहोचणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आंदोलनाने राज्यातील उद्योगधंद्यातील गुंतवणूक थांबेल व बेरोजगारीचा प्रश्‍न अधिक गंभीर होईल, म्हणूनच आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन एका पत्रकाद्वारे त्यांनी केले आहे.