Tue, Mar 19, 2019 03:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत रजिस्टर पोस्टाने महिलेला ‘तीन तलाक’

भिवंडीत रजिस्टर पोस्टाने महिलेला ‘तीन तलाक’

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 1:19AMभिवंडी : वार्ताहर 

तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत व्हावे यासाठी संसदेत प्रयत्न सुरू असतानाच भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी रजिस्टर पोस्टाने तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सरदार मंसूरी, सासरा इसरार, सासू जुलेखा, दिर रेहान, जाऊ अफरीन (सर्व रा. गुलजार नगर) अशी गुन्हा दाखल केलेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.

पीडित महिला शबनम (20 रा. विठ्ठल नगर) हिचा 5 मे 2016 रोजी सरदार याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून शबनमच्या आई-वडिलांनी जावई सरदार यास मोटारसायकल दिली होती. मात्र दुसरी मोटारसायकल घ्यावयाची आहे असे सांगून वडिलांकडून नवीन मोटारसायकल अथवा 50 हजार रुपये घेवून ये असा तगादा त्याने तिच्याकडे लावला. मात्र त्यास शबनमने नकार दिल्याने त्याने तिला त्रास देवून शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर पती इसरार याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रजिस्टर पोस्टाने तीन तलाक दिले आहे. 

या घटनेनंतर शबनमने पोलीस ठाणे गाठून पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.