Sat, Dec 15, 2018 19:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी नोकरीत राजकीय हस्तक्षेप ठरणार शिस्तभंग

सरकारी नोकरीत राजकीय हस्तक्षेप ठरणार शिस्तभंग

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:12AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

शासकीय सेवत असणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यांच्या सेवेसंबंधीच्या कोणत्याही प्रकरणात वरिष्ठांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करणे, सरकारी सेवेतील एखाद्या अधिकारी, कर्मचार्‍याच्या बाबतीत प्राप्त झालेला पत्रव्यवहार व शिफारशींसी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा जर करण्यात आला नसेल तर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने आहेत. 

शासकीय कर्मचार्‍यांनी त्यांच्या सेवाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच वैयक्तिक कामे करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते किंवा अन्य कुणा बाहेरील व्यक्तीचा दबाव आणू नये अशा सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. वरिष्ठांवर अशा प्रकारचा कुणी दबाव आणत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांकडून त्यासंदर्भात खुलासा घेण्यात यावा. एखाद्या पत्रव्यवहार, शिफारशीसंदर्भात योग्य तो खुलासा आला नाही, तर त्यास संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांची मूकसंमती असल्याचे गृहीत धरून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.