होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमजद अली खाँ यांना

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमजद अली खाँ यांना

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणार्‍या दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा  पुरस्कार सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ यांना देण्यात येणार आहे. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराने आशा भोसले यांना गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनुपम खेर यांना त्यांच्या भारतीय थिएटर आणि चित्रपटातील कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.

शेखर सेन यांना त्यांच्या थिएटरमधील योगदानाबद्दल आणि  धनंजय  दातार यांना त्यांच्या सामाजिक उद्योजकतेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे साहित्यिक कवी योगेश गौर यांना वाग्विलासिनी पुरस्कार तर राजीव खांडेकर यांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल श्रीराम गोगटे पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून अनन्या या नाटकाला मोहन वाघ पुरस्कार बहाल करून गौरविण्यात येणार असून सेंट्रल सोसायटी ऑफ एज्युुकेशनच्या अध्यक्षा माननीय मेरी बेल्लीहोंजी यांना बधिरांसाठीच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि सामान्य लोकांमधील बधिरांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कामगिरीबद्दल आशा भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार देऊन संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

Tags : Mumbai, Dinanath Mangeshkar, Award, Amjad Ali Khan, Mumbai news,