Sun, Nov 18, 2018 13:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुळ्यात एकवटले भगवे वादळ

धुळ्यात एकवटले भगवे वादळ

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 1:49AM

बुकमार्क करा
धुळे : प्रतिनिधी

वाढती गुंडगिरी अन् कायदा-सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा याविरोधात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने धुळ्यात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. व्यापार्‍यांसह समाजातील लाखो तरुणांनी मोर्चात हजेरी लावत शहर गुंडगिरी, अवैध धंदेमुक्‍त करण्याची मागणी केली. क्रांतीमोर्चा पूर्ण शांततेत पार पडला. महाराष्ट्र बंददरम्यान काही तरुणांनी तोडफोड करत आक्षेपार्ह घोषणा दिल्याने याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजन समितीने जाहीर केले होते. सकाळी चाळीसगाव रोड चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा आग्रारोडमार्गे कराचीवाला खुंट, महानगरपालिकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंचा जयघोष करण्यात आला. संपूर्ण परिसर भगवेमय झाला होता. एकता भागवत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले.