Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मेंद्र, राजकुमार हिराणी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर

धर्मेंद्र, राजकुमार हिराणी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर

Published On: Apr 16 2018 12:22AM | Last Updated: Apr 15 2018 11:50PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

ज्येष्ठ सिनेअभिनेते धर्मेंद्र व प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना राज्य शासनाचा ‘राजकपूर जीवनगौरव’  पुरस्कार, तर विजय चव्हाण आणि मृणाल कुलकर्णी यांना चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केलेले तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारांची निवड केली. दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्याम भूतकर, नाना पाटेकर, समीर अंजान, सुरेश ओबेराय यांचा या समितीमध्ये समावेश होता.

जीवनगौरव पुरस्कार पाच लाख, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपयांचा आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या 55 व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Tags : Dharmendra, Rajkumar Hirani, declared, Jeevan Gaurav,