Sun, Jun 16, 2019 02:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बालिकेशी अश्लील चाळे करणार्‍या नराधमाला अटक 

बालिकेशी अश्लील चाळे करणार्‍या नराधमाला अटक 

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:12AMधारावी : प्रतिनिधी 

वडिलांचा मित्र असल्याचे सांगून एका सहा वर्षाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे करणार्‍या मुरुगन (35) या नराधमाला अँटॉपहील पोलिसांनी मोठ्या शिताफीने शिव कोळीवाड्यातील रावळी कॅम्प परिसरातून गुरुवारी अटक केली. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 शिव कोळीवाड्यातील रावळी कॅम्प झोपडपट्टीत राहणार्‍या मुरगनने त्याच परिसरात राहणार्‍या या चिमुरडीला घराबाहेर नेवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याबाबत  एका शेजार्‍याने हटकल्यानंतर  मुरगनने घटनास्थळावरून पोबारा केला.

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी चिमुरडीसह अँटॉपहील पोलीस ठाणे गाठले आणि या नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक टी.के कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हेगाराची माहिती गुन्हे प्रगटीकरण कक्षाला दिली. गुन्हे प्रकटीकरण कक्षाने  वडाळा टीटी परिसरात सापळा लावून मुरुगनला अटक केली. 
 

 

tags : Dharavi,news,little, girl, sexual, harssment, in Dharavi,