Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धनगर आरक्षणाचा अहवाल महिनाअखेरीस

धनगर आरक्षणाचा अहवाल महिनाअखेरीस

Published On: Aug 11 2018 1:40AM | Last Updated: Aug 11 2018 1:24AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) या संस्थेकडून या महिन्याअखेरीस अहवाल मागितला आहे. त्याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करून केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. 

धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, टाटा इन्स्टिट्यूटने अनेक राज्यांत, जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन अहवाल तयार केला आहे. तो अहवाल या महिन्याच्या अखेरीस येणार आहे. धनगर समाजाच्या मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांना पावसाळ्यात वनक्षेत्रात चराईसाठी मान्यता देण्याचा शासन निर्णय काढण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.