Wed, Apr 24, 2019 01:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारला समाजांत फूट पाडायची आहे का? : मुंडे

सरकारला समाजांत फूट पाडायची आहे का? : मुंडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाले. मात्र दुसरे आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. 

संभाजी भिडे यांना अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. संभाजी भिडे यांना अटक का होत नाही असा सवाल करतानाच धनंजय मुंडे यांनी सभागृहातील सर्व विषय बाजुला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली. यावेळी सभागृहामध्ये आमदार भाई जगताप, आमदार कपिल पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली.

दरम्यान रत्नागिरीच्या खेड येथेही रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना झाली आहे. एकीकडे भीमा कोरेगाव प्रकरण ताजे असताना अशापध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना सुरु आहे. या सरकारमध्ये महापुरूषांच्या पुतळयांची विंटबना सुरु असून समाजकंटकांना सरकारची भीती राहिलेली नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. रत्नागिरी-खेड प्रकरणातही सरकारने निवेदन करावे अशी मागणीही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

Tags : Dhannajay Munde, Sambhaji Bhide, Bhima Koregao, Police, Crime, Politics 


  •