Sun, Mar 24, 2019 10:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसे-काँगेस वाद : देशपांडे, पडवळ यांनी रचला हल्ल्याचा कट

मनसे-काँग्रेस वाद : देशपांडे, पडवळ यांनी रचला हल्ल्याचा कट

Published On: Dec 03 2017 9:48AM | Last Updated: Dec 03 2017 9:48AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि दिवाकर पडवळ या दोघांनीच मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ल्याचा कट आखल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

देशपांडे यांच्यासह आठही मनसे कार्यकर्त्यांना किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कट रचल्यानंतर तोडफोडीसाठी धुरी, सरोदे, मालप आणि चिल्ले हे पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचले. त्यापाठोपाठ कोकणे आणि सोळुंकी पोहोचताच सहाही जणांनी तोडफोड करून पळ काढल्याचे समोर आले आहे. पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा सापडल्याने अटकेतील मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पोलिसांनी आठही आरोपींना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टातील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एस. अराध्ये यांच्यासमोर हजर केले. गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड, बांबू, दगड आणि मोटारसायकल जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. आरोपींनी कोणालाही इजा केलेली नाही. गुन्ह्यात मोटारसायकलचा वापर झालेला नसून घटनास्थळी पडलेल्या दगड, लोखंडी रॉड, बांबूचा वापर करण्यात आला होता. सर्व आरोपी, साक्षीदारांचे जबाब नोंदवून झाले आहेत.आरोपी हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी आत्मसर्मपण केले आहे. ते पळून जाणार नाहीत. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी आरोपींच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर आणि अर्चित साखळकर यांनी न्यायालयात केली.

संबंधित बातम्या :
मनसेच्या ११ आंदोलकांवर पुन्हा कारवाई
मनसेचे काल खळ्ळखट्याक आज पोस्टरवॉर; निरुपम यांच्या घराबाहेर लावला आक्षेपार्ह फलक