Thu, Nov 15, 2018 18:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजर्षी  शाहू छत्रपतींना मरणोत्तर भारतरत्न द्या 

राजर्षी  शाहू छत्रपतींना मरणोत्तर भारतरत्न द्या 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राजर्षी शाहू छत्रपतींना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली.  कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाच्या ठरावावर बोलताना राजेश क्षीरसागर यांनी ही मागणी केली.

कोल्हापूर संस्थानचे अधिपती म्हणून राजर्षी शाहू छत्रपतींनी केलेल्या कार्याचा देशभर गौरव होत आहे. विधिमंडळ व संसदेच्या आवारातही राजर्षी शाहू छत्रपतींचे पुतळे उभारण्यात आले आहेत.  उत्तर प्रदेशात मायावती सरकारने कानपूर विद्यापीठाला राजर्षींचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.  त्या पार्श्‍वभूमीवर राजर्षींना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी राज्याने केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. 

Tags : Rajarshi Shahu Chhatrapati, Bharat Ratna, Rajesh Kshirsagar, Demand, 


  •