Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेसबुकवरून बदनामी; तरुणीला अटक 

फेसबुकवरून बदनामी; तरुणीला अटक 

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी

विलेपार्ले येथे राहणार्‍या एका महिलेसह तिच्या बहिणीचे बोगस फेसबुक अकाऊंड उघडून अश्‍लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून बदनामी केल्याप्रकरणी एका 22 वर्षांच्या तरुणीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी रविवारी अटक केली. 

प्रेमात दगा देणार्‍या प्रियकराला धडा शिकविण्यासाठी तिने हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तिच्या कबुलीनंतर तिला पुढील चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिला सोमवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

तक्रारदार महिला ही विलेपार्ले परिसरात राहते. तिच्यासह तिच्या बहिणीचे काही अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर चार वेगवेगळे अकाऊंड उघडले होते. या अकाऊंडमध्ये तिचा मोबाईल क्रमांक, अश्‍लील मॅसेज, फोटो आणि व्हिडीओ टाकण्यात आला होता. त्यानंतर त्याच अकाऊंटमधून तिच्या परिचित मित्रांसह नातेवाईकांना फे्रण्डस रिक्‍वेस्ट पाठविण्यात आली होती. काहींनी हा मजकूरासह फोटो आणि व्हिडीओ पाहिला. दरम्यान तिला काही अज्ञात व्यक्तीकडून फोन येऊ लागले. या फोनमुळे तिला प्रचंड मानसिक त्रास झाला होता. मित्रांसह नातेवाईकांकडून हा प्रकार समजताच तिने विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली . याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत होते.  पोलिसांनी फेसबुक अकाऊंड ब्लॉक करुन माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यानंतर तिला  विलेपार्ले पोलिसांनी अटक केली.सोमवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.