Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. दीपालीला उडवणार्‍या चालक महिलेला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’?

डॉ. दीपालीला उडवणार्‍या चालक महिलेला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मरीन ड्राईव्हवर गाडीने उडवल्याने मृत्यू झालेल्या नायर दंत महाविद्यालयातील डॉ. दीपाली लहामटे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषीवर कारवाई व्हावी याकरता रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी एकत्र येत न्यायासाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, डॉ.दीपालीला उडवणार्‍या चालक शिखा झवेरीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक देण्यात आल्याचा आरोप ही घटना प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी केला आहे. 

24  मार्च वेळ संध्याकाळची चार वाजताची काम संपवून डॉ. दीपाली नेहमीप्रमाणे रूग्णालयातून बाहेर पडल्या. डॉ. दिपाली रस्ता ओलांडायला गेल्या मात्र भरधाव येणार्‍या गाडीने त्यांना उडवले. जे. जे. रुग्णालयात डॉ. दीपाली यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. 

नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्रेड यांनी सांगितले. की, डॉ. दीपाली ही आमची विद्यार्थी होती. रस्ते अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्याने तिचा मृत्यू झाला. अपघाताला जबाबदार असलेल्या दोषीची अटक होऊन तातडीने सुटकाही झाली आहे. यावर आमचा आक्षेप असून दोषींवर कारवाई व्हावी, याकरता रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांनी एकत्र येत न्यायासाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे.

नायर रूग्णालयातील डॉक्टरांमध्ये संतापले असून या मोहिमेबाबत सांगताना रुग्णालयातील इंटर्न बानी यांनी सांगितले की, डॉ. दिपालीला न्याय मिळावा यासाठी आम्ही ऑनलाईन मोहिम राबवत आहोत. नायर दंत महाविद्यालय स्टुंडट असोसिशन या फेसबुक पेजवर ही मोहिम सुरू केली आहे. दोषीला जामीनावर सोडण्यात आले आहे. या अपघातानंतर दिपालीच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. त्यामुळे ऑनलाईन याचिका दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.

दीपालीच्या मृत्यू अपघातामुळेच झाला आहे. ज्या गाडीमुळे अपघात झाला. त्या व्यक्तीने जरी मदत करून दीपालीला वेळेवर रुग्णालयात दाखल केले असते तर तिचे प्राण वाचले असते. परंतु, त्यांनी पळ काढला. अशा घटना अनेकदा घडतात आणि दोषींना शिक्षा होत नाही असे घडू नये याकरता डॉक्टरांनी एकत्र येऊन ही मोहिम सुरू केली आहे, असेही बानी यांनी सांगितले.

पोलिसांचे वेळकाढू धोरण 

दुचाकीस्वाराने त्वरित त्या महिलेला अडवून जवळच्या पोलिसांना अपघाताबाबत माहिती दिली व त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला मरीन लाईन्स पोलीस स्थानकात नेले. मात्र दुपारी साडेतीन वाजता अपघात घडल्यानंतरही पोलिसांनी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल केला. या दरम्यान शिखा झवेरीचे कुटुंबिय पोलीस स्थानकात पोचले व तिच्यासाठी पिण्याचे पाणी व सँडवीच आणले. याचाच अर्थ शिखाला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. 

Tags : mumbai news,  Deepali accident,  driving woman, VIP treatment, 


  •