Fri, Jul 03, 2020 02:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरा जिल्ह्यांमध्ये कोविड-१९ लॅब 'डब्ल्यूएचओ'च्या मार्गदर्शक तत्वानुसार

अकरा जिल्ह्यांमध्ये कोविड-१९ लॅब 'डब्ल्यूएचओ'च्या मार्गदर्शक तत्वानुसार

Last Updated: Jun 05 2020 7:39PM

File Photoमुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना तूर्त प्रत्येक जिल्ह्यात कोविड-19 लॅब उभारणे शक्य नाही. असे स्पष्ट करताना राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने एक लॅब उभारण्यात येत असून राज्यातील उर्वरित ११ जिल्ह्यामध्ये स्वॅब लॅब या जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार उभाराण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राज्यसरकारच्यावतीने अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात दिली. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

वाचा : 'पंधरा दिवसांच्या आत सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा'

रत्नागिरीसह कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी तसेच मजूरांनी स्थलांतर केल्याने कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची निदान करण्यासाठी कोरोना स्वॅब लॅब टेस्ट नसल्याने जिल्ह्यात लवकर कोरोना लॅब सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका रत्नागिरीतील स्थानिक मच्छीमार खलील अहमद हसनमिया वास्ता यांच्यावतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्यायाचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांच्या  खंडपीठासमोर  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. या याचिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्य सरकारला चांगलेच घारेवर धरत जिल्हास्तरीय कोविड-19 लॅब का नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला होता.

आज सुनावणीच्यावेळी अ‍ॅडव्हाकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारची भूमिका मांडताना कोविड स्वॅब लॅबसाठी मायक्रो बायोलॉजिकल लॅबची आवश्यक्ता असते. असे स्पष्ट करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शत्क तत्वानुसार लॅब उभारल्यानंतर त्या लॅबमध्ये अनुभवी कर्मचारी तसेच विषाणु पसरु नये म्हणून अद्ययावत यंत्रणा आणि साधनसामुग्री आवश्यक आहे.

त्यामुळे अशाप्रकारे जिल्हास्थस्तरीय लॅब उभारणे शक्य नाही. तसेच राज्यात आतापर्यंत ७८ स्वॅब लॅब उभारण्यात आल्या असून, त्यात मुंबईत २२, पुणे १९, ठाणे ६, नागपूरमधील ६ लॅबचाही समावेश आहे. तसेच १०० संशयित रुग्ण आढळल्यावरच लॅब उभारण्यात याव्यात या आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच त्यांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तर याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी राज्यातील सुमारे २४ जिल्ह्यांमध्ये लॅब कार्यरत आहेत. तसेच १०० संशयित रुग्ण आढळल्यावरच लॅब उभारण्यात याव्यात या आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच त्यांची उभारणी करण्यात येत असलेला राज्य सरकारचा दावा खोडून काढताना धुळे जिल्ह्यात केवळ केवळ कोविडचे १२ रूग्ण असताना लॅब सूरू करण्यात आली. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच रत्नागिरी जिल्हा वगळता ११ जिह्यांमध्ये लॅब अस्थितवात नाहीत रत्नागिरी जिल्ह्यात लॅब उभारण्यासाठी राज्य सरकारने एक कोटी ७ लाखाची तरतूद केली आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. उभय पांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने यचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

वाचा : देशात एका दिवसात २७३ जणांचा कोरोनाने मृत्यू; सर्वांधिक १२३ मृत्यू एकट्या महाराष्ट्रात!