Fri, Jul 19, 2019 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › MPSC भरतीचा लवकरच निर्णय, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

MPSC भरतीचा लवकरच निर्णय: मुख्यमंत्री

Published On: Mar 14 2018 1:32AM | Last Updated: Mar 14 2018 11:04AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य लोकसेवा आयोगाची  (एमपीएससी) भरती सुरू करण्यासाठी राज्य सरकार लवकरच उपाययोजना करेल, असे स्पष्ट आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. एमपीएससी भरतीसाठी सध्या सुरू असलेली काही आंदोलने खासगी क्लासेसने पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी बसत असताना भरतीच होत नसल्याने त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केला होता. ते म्हणाले, सध्याच्या सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या आदिवासी आणि शेतकरी आंदोलन पहाता पुन्हा एकदा हेच स्पष्ट झाले. एमपीएससीच्या पदांची भरतीच होत नसल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा निघाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या शेकडो तरुणांचा मोर्चा मुंबईत आला आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.