होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवली क्‍लस्टरसंदर्भात महिनाभरात निर्णय : मुख्यमंत्री 

कल्याण-डोंबिवली क्‍लस्टरसंदर्भात महिनाभरात निर्णय : मुख्यमंत्री 

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:23AMमुंबई :

मुंबई महानगर क्षेत्रात समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजना लागू करण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. शहरांचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी समूह विकास योजनेला प्राधान्य देण्यात येत असून कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात क्लस्टर योजना लागू करण्याबाबत एक महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

ठाण्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जगन्नाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, एमएमआर क्षेत्रात क्लस्टर डेव्हलपमेंटची मागणी येत होती. त्याचा विचार करता नवीन सामाईक डीसीआर तयार करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच  त्यावर निर्णय होईल, असे स्पष्ट करत एका महिन्यात यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.