Thu, Jun 27, 2019 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजेश पाटीलच्या जामीन अर्जावर १३ रोजी फैसला

राजेश पाटीलच्या जामीन अर्जावर १३ रोजी फैसला

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:22AMरायगड : प्रतिनिधी 

बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणातील सहआरोपी राजेश पाटील याच्या जामीन अर्जावरील सुनावणी शनिवारी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात झाली असून या जामीन अर्जावरील निकाल 13 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी आश्‍विनी गोरे-बिद्रे यांची दीड वर्षापुर्वी रत्नागिरी येथून कोकण परिक्षेत्राच्या नवी मुंबई येथील नागरी हक्क संरक्षण विभागात बदली झाल्यानंतर  त्या 11 एप्रिल  2016 पासून त्या कळंबोली येथून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. ज्या दिवसापासून आश्‍विनी गोरे-बिद्रे बेपत्ता झाल्या त्या काळात अभय करुंदकर आणि राजेश पाटील यांच्याच मोबाईलवर अनेक वेळा बोलणे झाले होते. त्याकालावधीत राजेश पाटील जळगावहून मुंबईला आल्याचे निष्पन्न झाले होते . त्यामुळे राजेश पाटील यांचा या प्रकरणाशी सबंध असल्याचा संशय आहे. यावरून नवी मुंबई पोलिसांनी  राजेश पाटील यांना जळगावहून चौकशीसाठी ताब्यात घेतले. याच चौकशीदरम्यान त्याला अटक केली होती.  

आश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर याच्या साथीला असणार्‍या राजेश  पाटील याने रायगड जिल्हा न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी आपला अर्ज दाखल केला होता. जमीन अर्ज दाखल केल्यानंतर हा अर्ज प्रत्यक्षात सुनावणीसाठी 2 एप्रिल 2018 रोजी न्यायालयासमोर आला. 2 एप्रिल रोजी आरोपीचे वकील आणि सरकारी पक्षाचे वकील यांनी आपला युक्तिवाद सादर केला होता.

त्यानंतर राजेश पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी न्यायालयाने 7 एप्रिल ही तारीख दिली होती. त्यानुसार शनिवारी जिल्हा तदर्थ सत्र न्यायाधीश कांबळे यांच्यासमोर आज जामीन अर्जावर सुनावणी झाली. आरोपीकडून अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी आपली बाजू मांडली तर सरकार पक्षातर्फे  सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार यांनी आपला युक्तिवाद सादर केला. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत जिल्हा तदर्थ सत्र न्यायाधीश कांबळे यांनी  राजेश पाटील यांच्या जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी 13  एप्रिल ही तारीख दिली आहे.

Tags : mumbai, mumbai news, Rajesh Patil, bail application, Decision,