Fri, Apr 26, 2019 19:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शरद पवारांच्या हत्येने पाप लागणार नाही’; फेसबुकवरून धमकी

‘शरद पवारांच्या हत्येने पाप लागणार नाही’; फेसबुकवरून धमकी

Published On: Jan 04 2018 3:46PM | Last Updated: Jan 04 2018 4:17PM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेत हिंदू संघटनांचा हात असल्याचा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सुरु असलेल्या भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. सोशल मीडियावरून एका व्यक्तीने शरद पवार यांनाच धमकी दिली आहे. 

अवधूत प्रकाशराव शिंदे असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने शरद पवार यांच्या हत्येने पाप लागणार नाही, असे म्हटले आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहले आहे. आव्हाड यांनी पत्रात म्हटले आहे की, https://www.facebook.com/FadnavisforMaharashtra/ या फेसबुक पेजवर शिंदे याने देशहितासाठी शरद पवार सारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही, अशा प्रकारची पोस्ट केली आहे. अशा प्रकारची पोस्ट टाकणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ही धमकीवजा पोस्ट गांभीर्याने घेऊन संबंधीतांवर तात्काळ गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे.

No automatic alt text available.