Mon, Apr 22, 2019 23:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेलेल्या रोगट कोंबड्यांचे  मांस चायनिज गाड्यांवर!

मेलेल्या रोगट कोंबड्यांचे  मांस चायनिज गाड्यांवर!

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत मेलेल्या रोगट कोंबड्यांच्या चिकनची विशेषत: चायनीज गाड्यांवर सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एफडीए आणि महापालिकेने शिवडीत टाकलेल्या धाडीमध्ये हा जीवघेणा प्रकार उघडकीस आला.

मुंबईच्या शिवडीमधल्या एका झोपडीत विनापरवाना कोंबड्या कापल्या जात असल्याचे प्रशासनाला समजले. विशेष म्हणजे कापण्यात येणार्‍या कोंबड्या आधीच मेलेल्या होत्या. मुंबईबाहेरून रोज लाखो कोंबड्या मुंबईत आणताना त्यातील रोगट कोंबड्यांचा मृत्यू होतो. या मेलेल्या कोंबड्या पूर्वी रे रोडला कच-याच्या ढिगा-यात टाकल्या जात.पण आता याच कोंबड्या थोडे पैसे देवून अशा झोपड्यांमध्ये आणून त्या कापल्या जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. दुपारनंतर चायनिज पदार्थांच्या गाड्यांवर हे स्वस्त चिकन पाठवले जात होते.